पुणे पोलीस क्राईम न्यूज प्रशांत धर्मराज policecrimenews.com
पुणे दि ८/१०/२०२४ : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेची पुणे व पश्चिम महाराष्ट्र विभागीय सह-विचार सभा नुकतीच अहिंसा – भवन, दादावाडी, स्वारगेट येथील सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश रणदिवे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्याधर भूस विजयकुमार लुंगाडे महावीर घोडके शालिनीताई पळसापुरे पवन अंबुरे रुपेश वायकोस ईशाताई कोळेकर दिपक वर्णे शैलेश कंगळे राजेश नाकील उपस्थित होते.
उद्योगपती प्रितम सतीश दोशी यांनी युवकांनी नौकरीच्यमागे न लागता व्यवसाय करण्याचे आव्हान केले डॉ.एस.व्ही.भागवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगपतींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले, त्यात प्रशांत एखंडे [हुपरी] प्रफुल्ल खडके [नागपूर] अरुण कंगळे [धायरी, पुणे ] सुनील मंगुडकर [ पिंपरी, पुणे ], प्रशांत चाणेकर [ धानोरी, पुणे ] हे उपस्थित होते
महावीर घोडके यांनी समाजातील माहिती दिली शैलेश कंगळे यांनी आ.आर्यनंदी मुनी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.सुधीर काळे यांनी युवकांना नौकरीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. माधुरी काळे यांनी जैन ग्रंथात प्राकृत भाषेचे महत्व ह्या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती शालिनीताई पळसापुरे यांनी संस्थेच्या आर्यनंदी शिष्यवृत्ती ची माहिती दिली या वेळी रमेश रणदिवे, विजयकुमार संगवे ,केशरीनाथ जैन यांनी संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनेत रु. दहा हजार ची व दिपक वर्णे यांनी आर्यनंदी स्मारक योजनेला रु. दहा हजार रुपयाची मदत नकदी स्वरूपात जमा केली. या वेळी दिपक वर्णे यांनी सांगली,राजेश नाकील यांनी कोल्हापूर ,श्रीपाल जैन यांनी सातारा जिल्ह्याचा संजय महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्याचा अहवाल सादर केला.महावीर क्षिरसागर यांनी पुणे विभागाचा ,मदनलाल धर्मराज यांनी पुणे शहराचा, सुनील देशमाने यांनी पिंपरी – चिंचवडचा, नंदकुमार पिंजरकर यांनी पुणे ग्रामीण विभागाचा अहवाल सादर केला.
तसेचवैदेही पानगावकर,मंजुषा एकांडे, सुनंदा जैन यांनी आपले विचार मांडले .
प्रतीक्षा पांढरे, श्वेता दलाल,वैदेही पानगावकर व व सुधा भूस यांनी सूत्र संचलन केले. या वेळी पुणे व पश्चिम महाराष्ट्र तुन संस्थेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Leave a Reply