#कळंबधाराशिव पोलीस क्राईम न्यूज २४धाराशिव पोलीस क्राईम न्यूज 24लाईव्ह राहुल हौसलमल#
कळंब, दि 9/10/2024 /लोककल्याणकारी महायुतीचे सरकार हे पुन्हा सत्तेत यावे, हे साकडे आई तुळजाभवानी मातेला घालण्यासाठी शक्ती पदयात्रा कळंब ते तुळजापूर काढण्यात आली. साधारण ९० किमी चा पायी प्रवास करत अनेक गावात महायुती सरकारच्या कामाचा जागर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्षापासून अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीस साकडे घालण्यासाठी शक्ती पदयात्रेचे आयोजन भाजपा तालुका प्रमुख अजित पिंगळे यांनी केले होते.
तालूक्यातील खामसवाडी येथील रोकडेश्वरी देवीच्या मंदिरातून सुरुवात करण्यात आली होती. येरमाळा येथे मुक्कामी होती. यावेळी येडेश्वरी मंदिर येथे पद यात्रेचे स्वागत मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येडशी मुक्कामी होती त्या ठिकाणी पद यात्रेचे स्वागत संजय लोखंडे, प्रशांत पवार, शशांक सस्ते, संतोष सस्ते यांनी केले.
आळणी पाटी येथे सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक दत्ता कुलकर्णी यांनी स्वागत
केले. धाराशिव येथे आगमण झाल्यावर आमदार ज्ञानराज चौगुले, संपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी आदी उपस्थित होते.
तुळजापूर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शक्ती पदयात्राचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनंत कंदले आदी उपस्थित होते.
तद्नंतर तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची आरती करुन शक्ती पदयात्रेचा समारोप करण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, युवासेना मराठवाडा निरिक्षक किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
या शक्ती पदयात्रा दिंडीमध्ये शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, अनंत वाघमारे, खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे, युवा तालुकाध्यक्ष अमर मडके, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय पाटील, माजी सभापती विकास बारकुल, दत्तात्रय साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती रामहरी शिंदे, तालुका सरचिटणीस माणिक बोंदर, अनिल टेकाळे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती पंडितराव टेकाळे, अनिल टेकाळे, दत्ता देवळकर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकास कदम, मतीन पटेल, इलियाज खुरेशी, अरुण चौधरी, सतपाल बनसोडे प्रणव चव्हाण, शितल चोंदे, संतोष कसपटे, मदन बारकुल, रामकिसन कोकाटे, खंडेराव मैंदाड, कमलाकर दाने, महिला जिल्हा उपाध्यक्ष सरोजिनी राऊत, इम्रान मुल्ला, अभय गायकवाड, इम्रान काझी, अक्षय सातव, किशोर वाघमारे, हरिभाऊ शिंदे, हर्षद अंबुरे, आदी सहभागी झाले होते.
Leave a Reply